YuvakbharatiRapid Learn logoRapid Learn
Class 11गद्य / चरित्रपर निबंध (Prose / Biographical Essay)

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

by सुमती देवस्थळे

Rapid Learn 2-Minute Revision

Perfect for last-minute revision

2-Minute Revision Video

Video coming soon

  • नायक: लिओ टॉलस्टॉय (१८२८–१९१०), रशियाचे महान विचारवंत, लेखक व विश्वशांतीचे पुरस्कर्ते.
  • महान कादंबरी: 'वॉर अँड पीस' (युद्ध आणि शांती) ही सर्वात महान कादंबरी मानली जाते.
  • कठोर परिश्रम: लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी इतिहास, युद्धभूमी व सैनिकांचा सखोल अभ्यास केला.
  • पत्नीचे योगदान: पत्नी सोनी हिने २००० पानांचे हस्तलिखित स्वतःच्या हाताने सात वेळा लिहून काढले.

Detailed Summary

Detailed Summary Video

Video coming soon

टॉलस्टॉय यांची लेखन-तपश्चर्या

सुमती देवस्थळे यांचा हा पाठ टॉलस्टॉय यांच्या लेखनाची तपश्चर्या मांडतो. सत्य, शांती व त्यागाचे उपासक असलेल्या टॉलस्टॉय यांचा जन्म रशियातील 'यास्नाया पोल्याना' येथे झाला. 'वॉर अँड पीस' लिहिताना त्यांनी नेपोलियनच्या आक्रमणाचा इतिहास अभ्यासला, युद्धभूमीला भेट दिली, जुन्या सैनिकांच्या मुलाखती घेतल्या व युद्धाचे नकाशे गोळा केले.

ते अत्यंत चोखंदळ होते, कादंबरीची सुरुवात बारा ते पंधरा वेळा लिहून खोडली. मनासारखा भाग लिहिला की ते म्हणत, 'आज मी माझ्या अस्तित्वाचा एक अंश शाईच्या समुद्रात टाकून आलो आहे!'

सोनीचे योगदान व यश

पत्नी सोनी रात्री खोडाखोड केलेल्या पानांची सुवाच्य नक्कल उतरवत; तिने २००० पानांचे हस्तलिखित जवळजवळ सात वेळा लिहून काढले. १८६९ मध्ये कादंबरी पूर्ण झाली.

या कादंबरीत ५०० हून अधिक व्यक्तिरेखा असून प्रत्येकीचे स्वतंत्र, जिवंत अस्तित्व आहे, अगदी एका कुत्र्यालाही व्यक्तिमत्त्व आहे. म्हणूनच टॉलस्टॉय यांना 'पहिल्या दर्जाचे कलावंत' मानले जाते.